सामाजिक

भारतीय जनता मजदुर संघाचे मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील यांचा विष्णु भाऊ घुले यांच्या हस्ते सत्कार संपन्न 

केज/प्रतिनिधी

भारतीय जनता मजदुर संघाच्या मराठवाडा सचिव पदावर निवड झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचा विष्णु भाऊ घुले यांच्या सह मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार धनंजय कुलकर्णी मिडिया वार्ता मुंबई जिल्हा प्रतिनिधी बीड तथा दैनिक नवराष्ट्र तालुका प्रतिनिधी किल्ले धारूर,अभय जोशी दैनिक पार्श्वभूमी तालुका प्रतिनिधी अंबाजोगाई,संतोष घुले, अमोल मुळे,सरपंच उमरी, मल्हारी बारगजे,चंदुलाल मिसाळ,अप्पासाहेब आंधळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केज पंचायत समितीचे माजी सभापती विष्णु भाऊ घुले यांनी सांगितले की,आमचे मित्र पत्रकार चंद्रकांत पाटील यांना भारतीय जनता मजदुर संघाच्या वतीने गोरगरीब मजुर तसेच असंघटित क्षेत्रातील कामगार व त्यांच्या परिवाराला सेवा सुविधा देण्यासाठी संधी मिळाली असून त्याचा उपयोग गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

या सत्काराला उत्तर देताना पत्रकार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, भारतीय जनता मजदुर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शांत प्रकाशजी जाटव साहेब, राष्ट्रीय सचिव श्री. भाऊसाहेब घोडके सर, महाराष्ट्र राज्याचे सचिव श्री.धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा पातळीवर असंघटित क्षेत्रातील कामगार तसेच छोटे व्यापारी यांच्या प्रगती साठी सदैव कार्यरत रहाणार असुन शासकीय सुविधा मिळवुन देण्या साठी सतत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच आपण केलेला सत्कार हा पाठबळ देणारा आहे त्यामुळे सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!