न्यायालयीन

पिस्तुलने गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातुन आरोपीची निर्दोष मुक्तता,अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल 

पिस्तुलने गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातुन आरोपीची निर्दोष मुक्तता,अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

 

अंबाजोगाई/प्रतिनिधी

पिस्तूलने गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर आरोपा तून आरोपीची अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दि.१७ डिसेंबर २०२५ रोजी निर्दोष मुक्तता केली.

अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयातील S.C.No.२९ /२०२५ या प्रकरणात आरोपीविरुद्ध कलम१०९,११५,३५२, ३५१ भा.न्या.सं.तसेच कलम ३ व २५ भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ.रचना आर.तेहरा यांनी केली.सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेला पुरावा,तसेच आरोपीच्या विधिज्ञांनी घेतलेला उलट तपास व सादर केलेले युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरले.सरकार पक्ष आरोपीविरुद्ध आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने न्यायालयाने आरोपी प्रकाश मुंडे यांची निर्दोष मुक्तता केली.

आरोपीच्या वतीने विधिज्ञ डी.एम.काजगुंडे यांनी प्रभावीपणे काम पाहिले. त्यांना विधिज्ञ ए.डी. शेरेकर,बी.आय.चौधरी, अक्षय इंगळे व अनिल राठोड यांनी सहकार्य केले.अत्यंत गंभीर स्वरूपाचे व बहुचर्चित असलेले हे प्रकरण असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. न्यायालयाच्या या निर्णया मुळे कायदेशीर वर्तुळात तसेच परिसरात विधीज्ञ डी.एम.काजगुंडे यांनी आरोपी प्रकाश मुंडे यांची बाजू योग्य रीतीने मांडली याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!