भगवान श्रीकृष्ण आश्रम येथे आनंदी दीपावली महोत्सवात दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे होणार वाटप, प्रेरणादायी प्रबोधन व आध्यात्मिक प्रवचनाने उत्साहात साजरा होणार दिपावली उत्सव.- भागवत भुषण ह.भ.प. केशव महाराज शास्त्री

केज/ प्रतिनिधी

केज शहरात सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांचा संगम घडविणारा “आनंदी दीपावली महोत्सव” मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम भगवान श्रीकृष्ण आश्रम केज यांच्या वतीने,भागवत भूषण ह.भ.प.श्री.केशव महाराज शास्त्री यांच्या संकल्पनेतून शुक्रवार दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.या उपक्रमाचा उद्देश दिव्यांग बांधवांना दीपावली सणानिमित्त आनंदाचा वाटा देणे हा आहे.कार्यक्रमाच्या निमित्ताने अपंग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे संच तसेच फराळाचे वाटप करण्यात येणार आहे. समाजातील वंचित घटकांप्रती आपुलकीचा हा भावनिक व सेवाभावी उपक्रम ठरत आहे. प्रबोधन व प्रेरणादायी विचार.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०-३० वाजता प्रबोधन व्याख्यानाने सुरुवात होणार असुन सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.विठ्ठलरावजी लहाने यांनी “आनंदी जीवनाचा महामंत्र” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन होणार आहे. आध्यात्मिक प्रवचनाने प्रसन्न वातावरण यानंतर महान तपस्वी, परम त्यागी स्वामी भारतानंद गिरी महाराज यांच्या प्रवचन होणार आहे.सेवाभावी उपक्रमाने उजळणार दीपावली
दुपारी २ वाजता अपंग व्यक्तींना जीवनावश्यक साहित्य संचाचे वाटप करण्यात येणार आहे.तसेच सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन ह.भ.प.केशव महाराज शास्त्री व भगवान श्रीकृष्ण आश्रम भक्त परिवार यांनी केले आहे. समाजातील विविध स्तरातील मान्यवर, नागरिक, भाविक तसेच लाभार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.हा उपक्रम केवळ दीपावली सणापुरता मर्यादित न राहता समाजसेवेचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. आयोजकांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



