समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती समाजासाठीचा लढा सुरूच ठेवणार – धनंजय कुलकर्णी
भगवान परशुरामाच्या तपोभूमीतून लढ्यास सुरुवात

चिपळूण/प्रतिनिधी
समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षांपासून ब्राह्मण समाजाच्या हिताच्या न्याय मागण्यासाठी ना नेता,ना पदाधिकारी एक ब्राह्मण नेक ब्राह्मण हे ब्रिद घेऊन कार्यरत आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळ या संघर्षाचे यश असले तरी उर्वरित मागण्यासाठी पाठपुरवा करणेसाठी संघर्ष समितीची राज्यव्यापी बैठक रविवारी भगवान परशुरामाची तपोभूमी चिपळूण येथे पार पडली. परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्या बद्दल सरकारचे अभिनंदन करून उर्वरित मागण्या साठी पुन्हाएकदा सरकार दरबारी लोकशाही मार्गाने जाण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला व हा लढा सर्व माफक आणि न्यायिक मागण्या मान्य होईपर्यंत या वेळी सर्वानुमते घेण्यात आला.
समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षांपासून ब्राह्मण समाजाच्या हिताच्या न्याय मागण्यासाठी ना नेता,ना पदाधिकारी एक ब्राह्मण नेक ब्राह्मण हे ब्रिद घेऊन कार्यरत आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणे हे या लढ्याचे मोठे यश असले तरी देखील समाजाच्या उर्वरित मागण्याबाबत अजून कसलेच निर्णय घेण्यात आले नाही.
या बाबत संघर्ष समितीच्या बैठका झाल्यानंतर पुढील मागण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी भगवान परशुराम यांची तपोभूमी चिपळूण येथे रविवार दि.12 ऑक्टोबर रोजी भगवान परशुराम यांचे दर्शन घेऊन या लढ्यास सुरुवात करण्यात आली. लढ्याची दिशाठरविण्यात आली.
लोकशाही मार्गाने समाजाच्या उर्वरित मागण्यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवर निवेदन देऊन मागण्यांचे स्मरण करून देण्यात येणार आहे.टप्याटप्याने समाजाच्या उर्वरित मागण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असून वेळ पाडल्यास शासकीय प्रशासकीय पातळीवर आंदोलने करण्याचा निर्णय देखील या राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आला. संघर्ष समिती मुख्य समन्वयक धनंजय कुलकर्णी, प्रमोद पुसरेकर, दिपक रननवरे,श्रीकांत जोशी,अनिल दीक्षित धुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.
सुरुवातीस भगवान परशुराम यांना सामूहिक अभिषेक, महाआरती करण्यात आली.त्यांच्या चरणी नतमस्तक होवून राज्यव्यापी बैठक घेण्यात आली या बैठकीस प्रज्ञाताई भिडे मुंबई , अर्चना सरुडकर बदलापूर, भीमाशंकर कुलकर्णी औसा ,महेश महाराज भट धुळे,योगेश जानतीकर लातूर, हेमंत शेषराव कुलकर्णी,अंबड जि. जालना, वैभव रामचंद्र कुलकर्णी,संजय जोशी जालना, मधुसूदन दंडारे जालना, प्रसाद पाटील जालना, मोहनराव मुळे जाफराबाद अनंतमहाराज जाफराबाद, लक्ष्मीकांत बुगदाने टेंभुर्णी, नंदकुमार काळें टेंभुर्णी ,भुषण जोशी धुळे ,राहुल याज्ञिक धुळे विलासराव कुलकर्णी पिसादेवी,विनोद महाराज कुलकर्णी पिसादेवी, जीवन पाटील,अभिषेक समुद्रे ठाणे पिसादेवी श्री. विनोद कृष्णशास्त्री महाराज,श्याम रामपूरकर काका,विलास कुलकर्णी, मोहन रेघे,जीवन पाटील यांच्यासह राज्यभरातून संघर्ष समितीचे समन्वयक उपस्थित होते.



