स्वानंद सार्वजनिक वाचनालय आनंद गाव येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा, चला घेवू एकच वसा, मराठीला बनवू ज्ञानभाषा – डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांचे प्रतिपादन

केज/ प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे दिनांक १५ ऑक्टोबर २०२ ५ रोजी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती अर्थात वाचन – प्रेरणा दिन घेवू चला एकच वसा,मराठी ला बनवू ज्ञानभाषा हे घोषवाक्य प्रमाणभूत मानून ग्रंथप्रदर्शन,ग्रंथ वाचन,विश्व कोषाबाबत माहिती व कार्यशाळा, व्याख्यान,सामुहिक वाचन,चर्चा चर्चासत्र, कार्यगौरव,साहित्यीकांची मुलाखत,ग्रंथभेट आदी सांस्कृतीक कार्यक्रम साजरे करून वाचन – प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत विविध कार्यक्रम व उपक्रमसाजरे करण्यात आले.
चला घेऊया एकच वसा , मराठीला बनवू ज्ञानभाषा याचे नियमित पालन करून मराठी ज्ञानभाषा बनवण्यासाठी प्रत्येक मराठी साहित्य वाचावे व जपावे असे आवाहन ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष ,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाज समाजसेवक सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्यात डॉ. वसुदेवबप्पा गायकवाड यांनीव्याख्यान प्रसंगी अवाहन केले.सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी सरपंच शिवाजीराव गायकवाड हे होते.सर्वप्रथमडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले व सर्व कार्यक्रमाचे उद्घाटनही करण्यातआले.
विश्वकोषा बाबत माहिती व कार्यशाळेत दादासाहेब गायकवाड, ज्ञानोबा भोगजकर,डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.ग्रंथभेट २० वाचकांना देण्यात आले.सामुहिक वाचन करण्यात आले.तसेच वैयक्तीक ग्रंथवाचनही करण्यात आले. साहित्यीक,कवी प्रा. माणिकराव आनंदगांवकर यांची मुलाखत सेवानिवृत्त शिक्षक रामकृष्ण तात्या गायकवाड यांनी घेतली. तसेच जेष्ठ साहित्यीकांचा सत्कार रविंद्र गायकवाड पेन्टर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,पुष्पहार,ग्रंथभेट देऊन करण्यात आला.
ग्रंथ प्रदर्शनात माजी सरपंच रामराजे गायकवाड,रावसाहेब जाधव,अरुण गायकवाड, संजय सोनवणे,आनंद भैय्या गायकवाड, बबन पुंड ,कृष्णराजे गायकवाड, शिवदास गायकवाड, आर.ए.गायकवाड, कमलाकर साबळे, नारायण गायकवाड, यांच्यासह शेकडो टप्या टप्याने वाचकांनी सहभाग घेतला.सकाळी ८ ते रात्री ८ या वेळात सर्व कार्यक्रम संपन्न झाले.अध्यक्षीय समारोप माजी सरपंच शिवाजीराव गायकवाड यांनी केला.सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.



