शैक्षणिक

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त स्वामी विवेकानंद [माध्यमिक विभाग ] शाळेमध्ये भव्यदिव्य विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न,एकूण ४३ विद्यार्थ्यांनी याप्रसंगी विविध केले प्रयोग सादर 

केज/प्रतिनिधी

जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर[माध्यमिक विभाग] या शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भव्यदिव्य असे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. यामध्ये ५ वी ते ६ वी (लहान गट ) व ७ वी ते ८ वी (मोठा गट) या दोन गटामध्ये मिळून एकूण ४३ विध्यार्थ्यानी सहभाग नोंदवला होता.या कार्यक्रमाचे उद्घाटन जीवन विकास शिक्षण मंडळ केज या संस्थेचे सचिव जी.बी.गदळे, शाळेचे मा.मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक बी.पी. तिडके,ज्ञानसागरकोचिंग क्लाससेसचे संचालक प्रा.सिद्धेश्वर वायबसे शाळेच्या मु.अ.शिवनंदा मुळे यांनी केले.उद्घाटना नंतर या कार्यक्रमाचे परीक्षण शाळेतील विज्ञान शिक्षिका श्रीमती. गुंड मॅडम,विटेकर मॅडम तसेच तट सर व मैंद सर यांनी केले.सर्व विध्यार्थ्यानी अत्यंत उत्कृष्ट व विलोभनीय असे प्रयोग सादर केले.

यामध्ये विध्यार्थ्यानी लेझर तंत्रज्ञानाद्वारे पाण्यातील जिवाणू ओळखणे,भूअंतर्गत भूकंपाच्या हालचाली, स्वामी विवेकानंद स्मार्ट स्कूल,व इतर असे उल्लेखनीय प्रयोग सादर केले.राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त विज्ञान प्रदर्शनामध्ये लहान गटातून स्वरा राऊत हिने प्रथम पारितोषिक पटकावले.सोहम कापरे याने द्वितीय तर अनुज चाळक व विराज शिंदे यांनी तृतीय पारितोषिक मिळविले.तर मोठ्या गटातून अजय आदमाने व अथर्व नेहरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर शौर्य बारगजे व वेदांत राऊत यांनी द्वितीय तर सुदर्शन शिंदे याने तृतीय पारितोषिक मिळविले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेतील विज्ञान शिक्षक तट सर तसेच त्यांचे सहकारी यांनी केले.

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे, सचिव जी.बी.गदळे, सहसचिव उपेंद्र कोकीळ, कोषाध्यक्ष फजीलोद्दीन काजी, संचालक नारायण अण्णा अंधारे,शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी केले.या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित राहिले व कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!