आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण व स्वानंद सार्वजनिक वाचनालयात आदिवासी विकास दिन कार्यशाळा घेवून साजरा

केज /प्रतिनिधी
आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण,आनंदगांव ता. केज जि.बीड व स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगांव ता.केज जि. बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.३१ आॕगष्ट २०२५ रोजी आदिवासी दिन कार्यशाळा घेवून साजरा करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व ग्रंथालयाचे संस्थापक, जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाजसेवक,प्राचार्य, डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय सोनवणे,पाथरा येथील माजी सरपंच भगवान पवार,बबन पुंड,रावसाहेब जाधव, बाळासाहेब गायकवाड, रविंद्र गायकवाड पेंटर यांची उपस्थिती होती.
आदिवासींचा सर्वांगीण विकास हाच देशाच्या विकासाचा अंतिम विकास असेल असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.अध्यक्षीय समारोप डॉ. वसुदेवबप्पा गायकवाड यांनी केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन संस्थेचे व ग्रंथालयाचे विश्वस्त आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.



