अध्यात्मिक
संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने कुंबेफळ येथे ह.भ.प.रुपालीताई सवने यांचे किर्तन

केज/प्रतिनिधी
कुंबेफळ ता.केज येथे संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने सुरवसे कुटुंबाच्या वतीने भागवताचार्य ह.भ.प रुपालीताई सवने यांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे.
रुपालीताई सवने या महाराष्ट्रातील प्रतिथयश भागवताचार्य व किर्तनकार आहेत.झी टॉकीज वर सतत त्या धार्मिक कार्यक्रम मध्ये सहभागी असतात.कुंबेफळ येथे दि.७ डिसेंबर संकष्ट चतुर्थी दिवशी सायंकाळी ७ ते ९ असे सिद्धीविनायक गणेश मंदिरात किर्तन होईल व नंतर महाप्रसाद.या किर्तन सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन दिलीप सुरवसे,वसंत सुरवसे व शरद सुरवसे कुटुंबाच्या वतीने करण्यात आले आहे.



