अध्यात्मिक

उंदरी येथील ठोंबरे परिवारांनी जपली पंचेचाळीस वर्षांची दत्त जयंतीची परंपरा

केज/प्रतिनिधी

उंदरी ता.केज येथे समस्त ठोंबरे परिवाराच्या शेता मध्ये श्रीदत्त मंदिर,श्रीदत्त टेकडी या ठिकाणी कै. आबासाहेब ठोंबरे यांनी पंचेचाळीस वर्षे पुर्वी श्रीदत्त मूर्तीची प्रतिष्ठापना करत श्रीदत्त जयंतीची परंपरा चालू केली.दि.4 डिसेंबर रोजी दत्तजयंती चा दिवस असल्याने पंचे चाळीस वर्षांपासून चालत आलेली परंपरा मोठ्या उत्साहात कायम ठेवली

श्रीदत्त मंदिर,दत्त टेकडी उंदरी येथे गुरुवार दि. 4 डिसेंबर दत्तजयंती निमित्त मोठ्या उत्साहात भजन, जागर, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.कै.आबासाहेब ठोंबरे यांच्या स्वप्नात दत्ताचा साक्षात्कार होऊन प्रतिष्ठापना करण्यास सांगितले.त्यावेळी या दत्त मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.तेव्हा पासून आजपर्यंत ठोंबरे परिवार ही परंपरा समर्थ पणे पुढे नेत आहेत.

या ठिकाणाला दत्त टेकडी म्हणून सुद्धा ओळखले जाते.या ठिकाणी अनेक जणांचे नवस सुद्धा पूर्ण होतात अशी अख्यायिका आहे व हे दत्त मंदिर उंदरी सह पंचक्रोशी परिसरात प्रसिद्ध आहे.या ठिकाणी श्रीदत्त जयंती साठी उंदरी कुंभारवाडा,तांदुळवाडी, केकतसारणी,बनकरंजा, पिंपरी, पांगरी,आवरगाव, चंदन सावरगाव येथील लोक सहभाग घेतात.

समस्त ठोंबरे परिवाराच्या शेतामध्ये असलेले दत्त मंदिर व त्यांच्यावरील दत्त जयंतीची परंपरा भजन, जागर, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांनी उत्सव साजरा केला जातो. दत्तजयंती निमित्त गावातील गावातील भक्त एकवटत येऊन परंपरा चालू ठेवण्यासाठी परिश्रम घेऊन श्रीदत्त जयंतीचा आनंद घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!