सामाजिक

जानेगाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा, शितलताई लांडगे यांची उपस्थिती 

केज/प्रतिनिधी

दि. ८ मार्च २०२६ रोजी हनुमान मंदिर जानेगाव येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा सुंदर असा कार्यक्रम येडेश्वरी फाउंडेशनच्या प्रमुख तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला तालुकाध्यक्ष शितलताई लांडगे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला. यावेळी माता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले .गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला महिला दिनाचे औचित्य साधून केक कापून घोषणा देण्यात आल्या.

मान्यवरांनी आपापले विचार मांडले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा चटप व शुभांगी कांबळे यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा शितलताई लांडगे यांनी महिलांना संबोधित केले यावेळी त्यांनी सांगितले की,आजच्या युगात महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून आपले अस्तित्व तयार करावे,आपली नवीन ओळख निर्माण करावी स्वतःआर्थिक, सामाजिक,शारीरिक आणि शैक्षणिक रित्या सक्षम व्हावे महिला सक्षमी करणासाठी येडेश्वरी फाउंडेशन आपल्या सदैव पाठीशी आहे असा शब्द आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी महिला भगिनींना दिला.

प्रमुख पाहुणे म्हणून सीआरपी सोनिया चटप मॅडम, उमेदच्या सीआरपी कांबळे मॅडम,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्या सिंधुताई पारवे,उमा मॅडम,मायाताई कसबे रागिनीताई वाघमारे व गावातील मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.आभार प्रदर्शना नंतर कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!