गुन्हेगारी

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार,आरोपी विरुद्ध पोस्कोचा गुन्हा दाखल 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील एका खेडेगावातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 9 वर्षे तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी संभाजी दत्तू ढगे रा.केवड याच्या विरुद्ध केज पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.

केज तालुक्यातील एका खेडेगावातील अल्पवयीन मुलीवर दि.20/2/2014 ते दि.10/2/2023 दरम्यान पीडिता ही अल्पवयीन असताना तीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या सोबत वारंवार शारीरिक संबंध करून तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी बुधवारी रात्री 9-30 वाजता केज पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!