सुमंत धस लढवणार शिरूर घाट गणातून पंचायत समिती निवडणूक

केज/प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदूर घाट जिल्हा परिषद गटातील शिरूर घाट पंचायत समिती गणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस निवडणूक लढवणार असल्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे.नगर पंचायत व नगरपालीका च्या निवडणुका पार पडताच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणार आहेत.
त्या पार्श्वभूमीवर सुमंत धस यांनी शिरूर घाट पंचायत समिती गणात कॉर्नर बैठका,झंजावाती गाव भेट दौरे सुरू केले आहेत. काल नाहोली येथे गावभेट दौऱ्यानिमित्त शेकडो कार्यकर्त्यांनी सुमंत धस यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.सुमंत धस यांनी प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले की, गेल्या लोकसभा निवडणुकीला महायुती च्या उमेदवार ना.पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी आम्ही पूर्ण ताकतीने काम केले होते आणि पुढेही काम करत राहू.
एक वेळ संधी द्या निश्चितच तुमच्या सुखदुःखाला धावून येईल असा विश्वास सुमंत धस यांनी बोलताना व्यक्त केला. जिल्ह्यामध्ये सुमंत धस यांनी कोविडच्या काळात केलेले सामाजिक कार्य उत्कृष्ट असल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते दत्ता धस व सांगवीचे सरपंच संजय केदार यांनी यावेळी बोलताना सांगितले.



