केज नगरपंचायतच्या विकास कामांना गती, प्रभाग क्रमांक सात मध्ये रस्ता व नाली बांधकाम शुभारंभ.

केज/प्रतिनिधी
केज नगरपंचायतच्या विकास कामांना आता गती प्राप्त झाली असून प्रभाग क्रमांक ०७ येथील महात्मा फुलेनगर मधील मुख्य रस्ता उजगरे सर यांच्या घरापासून राजेंद्र सोनवणे यांच्या घरापर्यंत च्या रस्ता व नाली विकास कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते डॉ.हारूनभाई इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड, गटनेते राजूभाई इनामदार,नगरसेविका पद्मिनी आक्का शिंदे, ज्येष्ठ नागरिक नवनाथ धिवार सर,पाशाभाई शेख,बालासाहेब जोगदंड सर,नितीन धिवार सर, युवा नेते शाहरुख पटेल, असेफ शेख,विवेक बनसोड,धम्मानंद गायकवाड,आश्रुबा जोगदंड,जतीन धिवार, अशोक धिवार,अशोक क्षीरसागर, राहुल इनकर, सुहास समुद्रे,किरण जोगदंड,सुशील रोकडे, आत्माराम मस्के,भाग्यश्री गायकवाड,प्रमिलाताई मस्के, बंडूबाई मस्के, मैनाबाई साळवे, क्षीरसागर मावशी, अंजनाताई जावळे, लोचनाबाई समुद्रे, विमलताई जोगदंड, सोनालीताई समुद्रे, कचरूबाई मस्के,कौशल्य मस्के तसेच प्रभागातील महिला नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला असून या विकास कामा मुळे या परिसरातील नागरिकांना मोठादिलासा मिळणार आहे.दरम्यान नगर पंचायतने इतर भागातही मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



