शिरूरघाट पंचायतसमिती गणात सुमंत धस यांच्या जन आशीर्वाद दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद! सुमंत धस साठी नागरिकांचा नारा,बदल हवा तर – चेहरा नवा

केज/प्रतिनिधी
शिरूरघाट पंचायत समिती गणातून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले सुमंत धस यांनी गावभेट आणि जन आशीर्वाद दौऱ्याच्या माध्यमातून मुंडेवाडी, सारुळ,सारणी,केळगाव, बेलगाव,एकुरका, माळेवाडी,सांगवी येथील नागरिकांच्या भेटी घेऊन आशीर्वाद घेऊन चर्चा केली आहे.
नांदूर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या शिरूरघाट पंचायत समिती गणातील नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत आणि त्यांचे आशीर्वाद घेतले तसेच नाहोली, पिट्टीघाट,धोत्रा, गदळेवाडी या गावांमध्ये गावभेट व जण आशीर्वाद दौऱ्याच्या माध्यमातून नागरिकांना भेटणार असून गावभेट व जन आशीर्वाद दौऱ्याचा समारोप शिरूरघाट येथे करण्यात येणारअसल्याचे आयोजकांनी सांगितले.
सुमंत धस यांच्या जन आशीर्वाद दौऱ्याला तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती राहत आहेत,या गावभेट व जन आशीर्वाद दौऱ्यात सुमंत धस हे स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि त्यांच्याशी भविष्यातील विकासकामांवर चर्चा करत आहेत.
गेली पंधरा वर्षे समाजकारण व राजकारणात सक्रिय असून आज पर्यंत अनेक समाज हिताची कामे केली आहेत,शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे आंदोलन करणे,कोरोना सारख्या भयंकर काळात लोकांच्या मदतीला पडणे कोरोना सेंटर चालवणे, वैयक्तिक कोणी काहीही काम सांगितले तरी त्या व्यक्तीचे काम करणे, महिलांना उद्योगाची माहिती मिळावी यासाठी महिला उद्योग मार्गदर्शन शिबिर आयोजित केले.
अनेक महापुरुषांच्या जयंती साजरा केल्या या सह अनेक समाजहिताची कामे मी केली आहेत भविष्यात नागरिकांनी संधी दिली तर अजून जोमाने सामाज हिताची कामे करेल असा विश्वास सुमंत धस जण आशीर्वाद दौऱ्याच्या माध्यमातून नागरिकांना देत आहेत व नागरिकांचा देखील सकारात्मक प्रतिसाद सुमंत धस यांना आहे.
सुमंत धस यांच्या गावभेट व जनआशीर्वाद दौऱ्यात परिसरातील महत्त्वाचे सहकारी आणि मान्यवर उपस्थित आहेत यामध्ये सांगवी गावचे सरपंच श्री. संजय आण्णा केदार,उप सरपंच रामबप्पा बिक्कड, पिट्टी घाट येथील सहकारी आबासाहेब तांबडे,गुणवंत सांगळे,सुभाष बिक्कड, रमेश धस,बाळासाहेब केदार पाटील,आप्पा साहेब धस,प्रकाश केदार आदींसह अनेक तरुण व सहकारी सहभागी आहेत.
सुमंत धस यांच्या नेतृत्वा खालील या दौऱ्यामुळे शिरूरघाट पंचायतसमिती गणातील राजकीय आणि सामाजिक वातावरण अधिक सक्रिय झाले असून,सुमंत धस यांना नागरिकांचा मिळणार मोठा प्रतिसाद परिवर्तनाची नांदी आहे अशी चर्चा शिरूर पंचायत समिती गणातील गावांमध्ये सुरू आहे.



