अध्यात्मिकसामाजिक

आनंदगांव येथे खंडोबा यात्रेनिमित्त केज तालुका स्तरीय भव्य पशूप्रदर्शन संपन्न

केज/ प्रतिनिधी

पशूसंवर्धन विभाग जिल्हा परिषद,बीड,पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, केज,खंडोबायात्रा समिती ग्रामपंचायत आणि आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण, आनंदगांव ता.केज जि. बीड यांचे संयुक्त विद्येमाने दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी शनिवारी खंडोबा यात्रेनिमित्त केज तालुकास्तरीय भव्य पशू प्रदर्शन व वंध्यत्वतपासणी शिबीर व पशुपालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सकाळी ९ ते १० या वेळात वंध्यत्व तपासणी शिबीर व इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

१० ते ०१ पर्यंत भव्य पशू प्रदर्शन घेण्यात आले.चार वेगवेगळ्या गटात पुरस्कारांसाठी पशूंची निवड समितीने निवड केली.निवड समिती त पशूसंवर्धन सहआयुक्त डॉ.डि.टी.मसने,सह आयुक्त डॉ.सुदर्शन मुंडे, डॉ.देशपांडे, डॉ.देशमुख, डॉ.ठाकूर,डॉ.सातपुते यांनी काम पाहिले. अतिशय पारदर्शकपणे प्रथम,द्वितीय,तृतीय अशी वेगवेगळया गटात पशुंची निवड करण्यात आली.

सकाळ पासूनच पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. थळकरी अप्पा व त्यांच्या टीमने परिश्रम घेतले.त्यानंतर ०१ ते ० ४ पर्यंत पशुपालक मेळावा व बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर.डी.कदम हे होते.

प्रमुखपाहुणे व मार्गदर्शक म्हणून डॉ.देशपांडे, डॉ.मसने, डॉ.मुंडे,डॉ. मोहळकर,डॉ.थळकरी, डॉ.सातपुते,डॉ.ठाकूर, आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण,आनंदगांव ता. केज जि. बीड चे संस्थापक कार्यवाह प्राचार्य डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड, गोविंद गायकवाड,अशोक भोगजकर यांनी मागदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.थळकरी यांनी केले,सुत्रसंचलन डॉ. मसने यांनी केले. अध्यक्षीय समारोप जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर.डी.कदम यांनी केला

वेगवेगळया गटात प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांकाने निवड झालेल्या पशूंचे बक्षीस प्रथम – ५००० रु, द्वितीय ३००० रुपये, तृतीय २००० रुपये या प्रमाणे वेगवेगळ्या गटात प्रथम,द्वितीय,तृतीय आलेल्या पशूधनाचे बक्षीस पशुपालकांना चेकद्वारे करण्यात आले. तसेच पशुप्रदर्शनात सहभागी झालेल्या प्रत्येक पशुधनासाठी त्यात्या पशू पालकांना प्रति पशूधन नोंदणी प्रमाणे २०० रुपये प्रमाणे बक्षीस देण्यात आले.

पशू प्रदर्शनातील विजेत्यांना व सहभागींना चेक,प्रमाण पत्र व पुच्छ गुच्छ देवून जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त डॉ.आर. डी.कदम,आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाणचे संस्थापक कार्यवाह प्राचार्य डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड,गोविंद गायकवाड,अशोक भोगजकर,डॉ.देशपांडे, डॉ.डी.टी. मसने,डॉ. सुदर्शन मुंडे,डॉ.थळकरी अप्पा यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

सकाळ पासून कार्यक्रम संपेपर्यंत डॉ.ताराचंद गायकवाड, ग्रामपंचायतचे विठ्ठल गावरस्कर,गोविंद गायकवाड,खंडोबा यात्रा समिती,पशुधन पर्यवेक्षक, पशूसंवर्धन विभागाचे सर्व कर्मचारी,आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण चे प्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.केज तालुक्यातून पशूपालक आपल्या पशुधनासह शेकडोंच्या संख्येने उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.

शेवटी आभार प्रदर्शन आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण, आनंदगांव ता.केज जि. बीडचे संस्थापक कार्यवाह प्राचार्य डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी सर्व उपस्थितीतांचे, सहभागींचे,जिल्हा परिषद,पंचायत सामिती पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी,कर्मचारी यांचेही आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!