नांदेड मध्ये राज्याचा गौरव!राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेत शिवम मोराळे याने मिळविले ब्राँझ पदक

केज/प्रतिनिधी
नांदेड येथे झालेल्या १२ व्या नॅशनल ड्रॅगन बोट चॅम्पियनशिप २०२५-२६ या प्रतिष्ठित स्पर्धेत प्रगती विद्यालय,बीड येथील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या चि.शिवम अमोल मोराळे याने उल्लेखनीय कामगिरी करत ब्राँझ पदक मिळवून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले.या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील २५ राज्यांचे संघ सहभागी झाले होते. तीव्र स्पर्धेतही शिवम ने दमदार प्रदर्शन करत आपल्या क्रीडा क्षमतेची चमक दाखवली.
शिवमच्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाची दाद मिळत असून त्याच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.तो केज तालुक्यातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.उद्धवराव मोराळे यांचा नातू तसेच नांदुरघाट येथील डॉ. अमोल मोराळे यांचा मुलगा आहे.शिवमने मिळवलेले हे यश बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमानास्पद ठरत असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



