सामाजिक

वेळूवन बुद्ध विहारात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा संविधान देशाचा श्वास आहे – जयपाल मस्के

केज/प्रतिनिधी

समाजातील विषमता दुर करून माणसाला समान पातळीवर आणण्यासाठी संविधानाचे योगदान मोठे आहे.संविधानामुळे सर्वांना मुलभूत हक्क मिळाले.भारतीयसंविधान देशाचा श्वास आहे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष जयपाल राहूल मस्के यांनी केले. केज शहरातील भीमनगर येथील वेळूवन बुद्ध विहारामध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तेव्हा ते बोलत होते.

यावेळी विहारात नियमित येणाऱ्या चिमुकल्या कु. सानवी सुशील मस्के व कु.आर्या हजारे यांनी संविधान प्रास्ताविक म्हणून दाखविले.यावेळी विचारमंचावर भारतीय बौध्द महासभेचे माजी शहराध्यक्ष डॉ.प्रभाकर ठोके व कोषाध्यक्ष चंद्रकांत मस्के यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध व घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून उपस्थितांनी पंचशील ग्रहण केले.कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ.प्रभाकर ठोके यांनी संविधानाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. यावेळी घटनाकारांच्या जीवनातील घटना व प्रसंग सांगून नवचैतन्य निर्माण केले व संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखीत केले.कोषाध्यक्ष चंद्रकांत मस्के यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सुत्र संचलन शहरसरचिटणीस शिवकुमार मस्के यांनी केले.यावेळी विहारात भारतीय बौद्ध महासभेचे शहर पदाधिकारी कल्याण मस्के,शिवमूर्ती हजारे,सुशील मस्के, सचिन जगताप तसेच महिला शाखेच्या सरचिटणीस आयु.सुरेखा मस्के,विजयमाला हजारे, कलावती हजारे, रत्नमाला मस्के,आशाताई मस्के, पुष्पा मस्के,कुसुम मस्के तसेच बालक बालिका यांची मोठी उपस्थिती होती. शेवटी सरनत्त घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात बौद्ध उपासक,उपासीका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!