शैक्षणिकसामाजिक

संस्कारातून व वर्तनातून मूल्यवर्धन होते – प्रा.डॉ. मुरकुटे

केज/प्रतिनिधी

जिल्हाशिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई आयोजित मुल्यवर्धन 3.0 केज तालुकास्तरीय प्रशिक्षण साने गुरुजी निवासी विद्यालयात सुरू झाले असून या प्रशिक्षणाचा उद्घाटन समारंभ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाईचे वरिष्ठ अधिव्याख्याता प्रा.डॉ. मुरकुटे सर तर प्रमुख उपस्थित बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळाचे अध्यक्ष अँड. उध्दवराव कराड,जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री.दत्ता चाटे,श्रीमती पठाण मॅडम,कार्यक्रमाचे आयोजक जयपाल कांबळे सर,श्री.अरुण शिंदे सर,मुल्यवर्धन नोडल अधिकारी भारत मदने,मुल्यवर्धन तालुका समन्वयक श्री.चंद्रकांत मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. मुरकुटे सर म्हणाले की, भारतीय राज्यघटनेने न्याय,स्वातंत्र्य,समता आणि बंधुता जोपासणाऱ्या समृद्ध भारताचे स्वप्न पाहिले आहे.

पुर्वीच्या काळी शिक्षकांबद्दल आदरयुक्त भीती मुलांमध्ये होते,वृध्द आई -बाबांना सांभाळले जात होते.कारण त्या काळी मुलांना घरातुन, शाळेतुन शिक्षणा बरोबरच त्यांच्यात असणा-या मुल्यांना वाव दिला जायचा,घरातुन संस्कार व्हायचे आता ते दिसुन येत नाही.उच्च दर्जाचे शिक्षण मिळत,साधने, सुविधा मोठ्या प्रमाणात आहेत पण कुठे तरी मुल्यांचे संवर्धन व वर्धन कमी होत असलेल्या सध्याच्या पिढीत जाणवत आहे.त्यामुळे एन.इ.पी. 2020 मध्ये मुल्य शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शिक्षकां मधले व विद्यार्थ्या मधिल मुल्य वर्धित करणे गरजेचे आहे.

अन्यथा उच्च शिक्षण असेल पण संस्कार हिन व मुल्यहीन पिढी असेल म्हणून मुलांमध्ये असणा-या मुल्यांना शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातुन वर्धित करण्या साठी शिक्षकांवर ही जबाबदारी दिली आहे आणि ती आपण योग्य पद्धतीने पार पाडाल उद्याचे भावी नागरिक लोकशाहीतील जबाबदार संवेदनशील आणि मुल्याधिष्ठीत नागरिक व्हावेत हेच या प्रशिक्षणाचा उद्देश आहे असे मत व्यक्त केले.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अँड.उध्दवराव कराड,दत्ता चाटे यांनी ही मनोगत व्यक्त केले या प्रशिक्षणास केज तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणा-या सर्व शिक्षकांना दि.27-11- 2025 ते 13-12-2025 या कालावधीत पाच टप्प्यात हे प्रशिक्षण डायटच्या वतीने देण्यात येत आहे.यात एकूण बाराशे शिक्षक हे प्रशिक्षण कालावधीत घेणार आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपनर मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक श्री.अरुण शिंदे सर यांनी केले व आभार श्री.मुंडे सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!