सामाजिकसांस्कृतीक

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रला आणि देशाला सुसंस्कृत राजकारणाची शिकवण दिली – आनंद भैय्या गायकवाड

केज/ प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी ग्रंथ प्रदर्शन व व्याख्यान कार्यक्रम घेवून साजरी करण्यात आली.

आनंद भैय्या गायकवाड यांचे व्याख्यान संपन्न झाले.आपल्या व्याख्यानात यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याला व देशाला सुसंस्कृत राजकारणाची शिकवण दिल्याचे प्रतिपादन आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.

यावेळी जयंत सौदागर, यशवंत सौदागर यांनीही मनोगत व्यक्त केले.ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक,महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते प्राचार्य,डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.

अध्यक्षीय समारोपात यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील योगदान यावर सखोल विवेचन केले.महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांचे मोठेयोगदान असल्याचे प्रतिपादन डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाला वाचक,हितचिंतक, विद्यार्थी,जेष्ठ नागरीक यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!