केज येथील दोन महाविद्यालयातून दोन विद्यार्थिनी गायब, पालक वर्गात चिंतेचे वातावरण

केज/प्रतिनिधी
केज शहरातील दोन महाविद्यालयातील दोन तरुणी अचानक बेपत्ता झाल्यामुळे तालुक्यात व महाविद्यालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे.केज तालुक्यातील नामेवाडी येथील जयश्री मधुकर केदार वय २२वर्ष ही विद्यार्थिनी केज शहरातील जीवन शिक्षण महाविद्यालयात बी.एस्सी द्वितीय वर्षात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी बुधवार दि.४ मार्च रोजी सकाळी साडे आकरा वाजता आपल्या वडिलां सोबत परीक्षा फीस भरण्यासाठी महाविद्यालयात आली होती.परिक्षा फीस भरल्यानंतर दोघेही आवारातील कठड्यावर बसले होते.दरम्यान दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान जयश्री केदार ही वडिलांची नजर चुकवून बेपत्ता झाली आहे.पाहूणे व नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. वडिल मधुकर केदार यांच्या फिर्यादीवरून गुरूवारी केज पोलीस ठाण्यात या प्रकरणी हरवली असल्याची नोंद करण्यात आली आहे.तर
दुसरी घटना काळेगाव (घाट) येथील योगेश्वरी नंदकिशोर कोठावळे वय अठरा वर्षे ही विद्यार्थिनी भाऊसाहेब पाटील अध्यापक विद्यालयात शिक्षण घेत आहे. सोमवार दि.२ मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्या च्या दरम्यान ती अद्यापक विद्यालयातून कोणालाही न सांगता निघून गेली आहे.वडिल नंदकिशोर कोठावळे यांच्या फिर्यादी नुसार केज पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
अवघ्या तीन दिवसात केज शहरातील दोन महाविद्यालयीन वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणी बेपत्ता झाल्या असल्याने पालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली जमादार हनुमान मुंडे व जमादार शकील शेख हे पुढील तपास करीत आहेत.दरम्यान योगेश्वरी ही आळंदी देवाची येथे असल्याची माहिती मिळाली आसून लवकरच या प्रकरणा तील आरोपीसह दोघांना ही ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती जमादार शकील शेख यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर केज शहरात खळबळ उडाली आहे.

