गुन्हेगारी

केज पोलिसांचे जुगार अड्यावर छापे, 11 जण जेरबंद

केज/ प्रतिनिधि

तालुक्यातील येवता व केज शिवारात केज येथील पोलीस पथकाने छापे मारून तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या 11 जणांना केज पोलिसांनी ताब्यात घेतले आसून. त्याच्याकडील जुगाराचे साहित्य, नगदी, 6 हजार 75 रुपये, दोन मोबाईल व 7 दुचाकी मिळून एकूण 2 लाख 69 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 12 जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आसून त्यापैकी 11 जणांना जेरबंद करण्यात आले आसून 1 जण पळून गेला आहे.

केज शहरातील बीएसएनएल टॉवरच्या पाठीमागे असलेल्या व बंद पडलेल्या शाळेच्या परिसरातील शेतातील खुल्या जागेत काही तरुण जुगार खेळत असल्याच्या माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलीस उपनिरीक्षक जावेद कराडकर, जमादार बाळासाहेब अहंकारे, हनुमान मुंडे, पोलीस नाईक संतोष गित्ते, सिद्दीक शहा यांच्या पथकाने शुकवारी ( दि. 14 ) दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान त्या ठिकाणी अचानक छापा मारला आसता, या ठिकाणी शशिकांत अंकुश ढाकणे, अमोल अरुण धस (दोघे रा. शिक्षक कॉलनी, केज), विलास महादेव गायकवाड (रा. वडारवस्ती, केज), अजिज नबी शेख (रा. खॉजा नगर, बीड रोड केज), खुर्शीद चाँदसाब शेख (रा. बीड रोड केज) या पाच जणांना तिर्रट खेळताना रंगेहाथ पकडले. तर ईश्वर बालाजी लोंढे हा पळून गेला.

त्यांच्या कडील जुगाराचे साहित्य, नगदी रोख 5 हजार 300 रुपये आणि सहा दुचाकी असा 1 लाख 95 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जमादार हनुमान मुंडे यांच्या फिर्यादीवरून वरील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील येवता येथील तलाठी सज्जा कार्यालयाच्या समोर बसून काही लोक जुगार खेळत असल्याच्या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलीस शिपाई गोरख फड, एन टी. गोत्राळ यांच्या पथकाने शुक्रवारी ( दि.14 ) छापा मारला आसता,यावेळी अशोक बाबासाहेब काटकर, रघुनाथ गोविंदा चिंचकर, मसु नानाभाऊ काळे, बाळासाहेब भिमराव गायकवाड, बाबु दगडु गोरखे (सर्व रा. येवता), व महेंद्र महादेव समुद्रे (रा. फुलेनगर, केज), या सहा जणांना तिर्रट नावाचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडून जेरबंद करण्यात आले.

त्यांच्या कडील जुगाराचे साहित्य, नगदी रोख 3 हजार 750 रुपये, 2 मोबाईल, 1 दुचाकी असा 73 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस शिपाई गोरख फड यांच्या फिर्यादीवरून या सहा जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!