श्री राम कोकीळ यांच्या कडुन श्री संस्कार इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री. संस्कार इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना सोमवारी सकाळी श्री. राम कोकीळ यांच्याकडुन शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.याविषयी सविस्तर वृत्त असे की, चिंचोली माळी येथील रहिवासी व सध्या पुणे येथे यशस्वी उद्योजक म्हणून परिचित असलेले श्री.राम कोकीळ यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत व शालेय विद्यार्थ्यांना शेक्षणिक प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने व आपल्या भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे या उद्देशाने केज तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या श्री संस्कार इंग्लिश स्कूल मधील सर्व शिक्षीकांना व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
यावेळी बोलताना श्री.राम कोकीळ यांनी श्री संस्कार इंग्लिश स्कूल बद्दल गौरवोद्गार काढले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी पांडुरंग गलांडे सर,श्री संस्कार एज्युकेशन ग्रुप चे अध्यक्ष अनिल गलांडे, प्रिन्सीपल,संचालक अमोल गलांडे यांच्यासह सर्व शिक्षीका व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल गलांडे यांनी केले तर सूत्र संचालन आरती आचार्य यांनी केले व आभार प्रदर्शन प्रिन्सीपल सिमा फुटाणे यांनी केले.



