केज तालुक्यातील बोरगाव बुद्रुक येथील कुलदैवत खंडोबा मंदिर गावकऱ्यांसाठी प्रति जेजुरी वसारीधारक गोपाळ देव निंगुळे यांची माहिती

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील बोरगाव बुद्रुक येथील खंडोबा मंदिर हे नुकत्याच जवळ आलेल्या चंपाषष्ठी या सणासाठी पूर्ण सजावट करुन सज्ज झाले आहे.गोपाळ देव निंगुळे यांच्या सहकार्याने व भक्ती भावनेने बोरगाव बुद्रुक येथील खंडोबामंदिर प्रति जेजुरीचा रूपाने उदयास येत आहे.तसेच देवाची घटस्थापना व उपवास चालू झाले आहेत.व गावकऱ्यांनी खंडोबा देवाचे पारायण मंदिरामध्ये चालू केलेले आहे.यासाठी संपूर्ण समाजाचा पाठिंबा मिळत आहे.
येणारा चंपाषष्ठीचा उत्सव हा मोठ्या जल्लोषात आणि आनंदी वातावरणात करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे. व उपवासामध्ये देवाची नियमित आरती चालू आहे तरी उपस्थित भक्तगणांनी खंडोबा देवाचे वसारी धारक गोपाळ देव निंगुळे यांनी देवाच्या आरतीचा लाभ घ्यावा व उत्सवामध्ये सहभागी व्हावे असे संपूर्ण गावातील सर्व महिला व पुरुष बालक व जेष्ठ नागरिकांना आवाहन केले आहे.



