धर्मपीठाचा आशिर्वाद परांडकर ब्रम्हमठ युसुफ वडगाव येथे राचलिंग शिवाचार्य महाराजांचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे यांनी घेतला आशीर्वाद !

केज/ प्रतिनिधी
राजकीय आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष युसूफ वडगाव जिल्हा परिषद सर्कलचे उमेदवार तथा गंगा माऊली शुगरचे संचालक श्री.राहुल भैय्या सोनवणे यांनी गुरुवारी युसूफ वडगाव येथील परांडकर ब्रम्हमठ येथे राचलिंग शिवाचार्य महाराजांची भेट घेऊन त्यांचे दर्शन घेतले व त्यांचे आशीर्वाद घेतले.
धर्मपीठाचा आशीर्वाद हा धार्मिक कार्याबद्दल आदर व्यक्त करत राहुल भैय्या सोनवणे यांनी मठावर येऊन राचलिंग शिवाचार्य महाराजांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमी वर त्यांनी महाराजांकडून सदिच्छा व शुभेच्छा घेतल्या. यावेळी राचलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कडून सत्कार व शुभेच्छा घेऊन आशिर्वाद घेतले.
यावेळी राचलिंगशिवाचार्य महाराजांनी देखील राहुल भैय्या सोनवणे यांच्या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले.महाराजांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन राहुल भैय्या सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.
धर्मपीठाच्या या आशीर्वादामुळे राहुल भैय्या सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. या महत्त्वाच्या भेटीप्रसंगी राहुल भैय्या सोनवणे यांच्यासोबत शिवदास तात्या पाटील,बाळासाहेब नांदे,सुहास गुजर, नागनाथ राऊत,कोरसाळे आप्पा आदी मान्यवर उपस्थित होते.



