गुन्हेगारी

कोयत्याचा धाक दाखवून दोन वेळा केला अत्याचार ट्रॅक्टर चालकाचा ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाविरुद्ध पोस्को अंतर्गत गून्हा नोंद 

केज/प्रतिनिधी

परभणी ज़िल्ह्यातून ऊसतोड मजूर म्हणुन केज तालुक्यात आलेल्या ऊसतोड मजुराच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्याच ऊसतोड टोळीच्या ट्रॅक्टर चालकाने. कोयत्याचा धाक दाखवून केज तालुक्यातील सुर्डी व हादगाव शिवारात दोन वेळा बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली असून,नराधम ट्रॅक्टर चालक आरोपी विरुद्ध युसूफ वडगाव पोलिसात पॉक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यातील व जिंतूर तालुक्यातील एका खेडेगावातील ऊसतोड मजूर केज तालुक्यात ऊसतोडीच्या कामासाठी मजूर म्हणुन आला असून त्याच्या कुटुंबातील १३ वर्ष ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला त्याच ऊसतोडीचा ट्रॅक्टरचालक सूरज अशोक खरात रा. जामरुन,चारठाणा ता. जिंतूर जि.परभणी याने कोयत्याने जीवेमारण्याचा धाक दाखवून दि.१४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान सुर्डी (सोने सांगवी) शिवारातील रोडगे यांचे शेतातील कोपीत व दि.८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यानपुन्हा हादगाव (डोका) शिवारा तील बनसोडे यांचे शेतात कोयत्याचा धाक दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केला.

या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादी वरून मंगळवार दि.१० फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा ट्रॅक्टर चालक सूरज अशोक खरात याच्या विरुद्ध युसुफवडगाव पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.गून्हा दाखल होताच आरोपीने ट्रॅक्टर हादगाव (डोका) शिवारात सोडून तो फरार झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शना खाली पिंक पथकाचे प्रमुख पोलिस उप निरीक्षक प्रकाश शेळके हे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!