देशामध्ये निवडणूक आयोगाने स्वतंत्र यंत्रणा उभारावी – प्रा.बबनराव आंधळे

बीड/प्रतिनिधी
देशामध्ये वारंवार होणाऱ्या प्रत्येक विभागाच्या निवडणूका मग त्यामध्ये सहकार विभाग असेल सार्वत्रिक निवडणूक असेल अशा विविध प्रकारच्या निवडणुका सतत देशांमध्ये सुरू असतात निवडणूक आयोगाची ग्रामपंचायत सरपंच निवडणूक ते खासदारकी निवडणूक इथपर्यंत स्वतःची यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी केली आहे.
140 कोटी लोकसंख्या असलेल्या या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विभाग आहेत त्यामध्ये सहकार विभाग आहे. स्थानिक स्वराज्य संस्था सहकार प्रशासन,बँकिंग क्षेत्र अशा सार्वत्रिक निवडणूक या भारत देशामध्ये टप्प्या टप्प्याने पार पडत असतात. भारतामध्ये जन्म आणि मृत्यू यांचे प्रमाण लक्षात घेता निवडणूक आयोगाने त्यांचा पारदर्शक कारभार करण्यासाठी त्यांची स्वतःची यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे.
लोकशाहीच्या संकेता नुसार निवडणुका शांततेत आणि निर्विघ्न पार पडल्या पाहिजेत यासाठी स्वतंत्र यंत्रणेची आवश्यकता आहे.गेल्या कित्येक वर्षापासून निवडणूक आयोग शिक्षण विभाग,महसूल विभाग, सहकार विभाग,राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्याचा आणि त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचा उपयोग करून निवडणुका घेण्याचे काम केले आहे.याशिवाय मतदानाची नोंदणी करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना घरोघर पाठवून मतदान नोंदणी आणि इतर सर्व कामे करून घेतली जातात. यामध्ये एकबाजूला सदोष निवडणूक आयोगाची कार्यप्रणाली समोर आली आहे.
मतदाराचे दुबार नाव अनेक वेळा नावाची नोंदणी होणे,पत्ता बदलल्यानंतर दोन्ही ठिकाणी मतदाराची नोंदणी राहणे,फोटो आणि इतर आवश्यक अपुरी माहिती मतदार यादीमध्ये असणे मतदार यादीतून नाव कमी करण्या साठी अपुरी व्यवस्था असणे मृत्यू पावलेल्या लोकांची नावे यादीमध्ये कायम राहणे या आणि अशा विविध कारणांनी निवडणूक आयोगाच्या मतदार याद्या दोषपूर्ण राहतात या अत्यंत महत्त्वाच्या कामा साठी तात्पुरता कर्मचारी वर्ग घेऊन निवडणूक आयोग कामकाज करतो हे अत्यंत चुकीचे आहे.
केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 2014 पासून अत्यंत क्रांतिकारक आणि लोकहितकारक निर्णय घेतलेले आहेत त्याचा परिणाम आज देशांमध्ये स्पष्टपणे दिसतो आहे. जगाच्या पातळीवर भारताची निर्माण झालेली प्रतिष्ठा या सरकारची फलश्रुती आहे सर्व क्षेत्रात काम केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगा ची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे ही विनंती या निवेदनाच्या द्वारे केली जात आहे.
निवडणूक आयोगासारखे महत्त्वाचे काम करण्या साठी महसूल खात्या प्रमाणे गाव पातळीपासून निवडणूक आयोग कर्मचारी तालुका आणि जिल्हा निवडणूक आयोगाचे कार्यालय व कर्मचारी विभाग आणि राज्य पातळीवर आयुक्त आणि संचालक दर्जाचे कार्यालय राज्य आणि देश पातळीवर आज काम करत असलेले निवडणूक आयोगाचे कार्यालय आणि अधिकारी अशी निवडणूक आयोगाची स्वतंत्र रचना असली पाहिजे आणि ती कायम स्वरूपी इतर सर्व खात्या प्रमाणे शंभर टक्के अनुदानावर असली पाहिजे त्याशिवाय जन्म मृत्यूच्या नोंदी आणि मतदार याद्या अद्यावत होणार नाहीत.
देशाच्या लोकशाहीसाठी आणि प्रगतीसाठी निवडणूक आयोग सक्षम आणि कार्यक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे याकडे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे निवडणूक आयोगाची स्वतंत्र रचना आणि कार्यालये कार्यान्वित करावेत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येत आहे आपण या मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करून योग्य तो निर्णय घ्याल अशी अपेक्षा ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी या निवेदना मध्ये व्यक्त केली आहे.



