कृषीसामाजिक

केज येथील कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद ! दरवर्षी कृषी प्रदर्शन व्हावे ; शेतकरी, व्यावसायिकांची अपेक्षा

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील कृषिधन २०२५,शिंजीर मिल्क ॲण्ड ॲग्रो प्रोडयुसर कंपनी केज यांच्या वतीने दि.७ ते ९ हे तीन दिवसीय कृषीप्रदर्शन विठाई मंगल कार्यालय येथे संपन्न झाले.तिसऱ्या दिवशी समारोप कार्यक्रमात शेतकरी, विविध कंपनीचे स्टॉल धारक यांचा सन्मान करून संचालक विशाल चौरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी बोलताना उपस्थित शेतकरी आणि व्यवसायिकांनी पुढील वर्षी कृषी प्रदर्शन आयोजित करावे अशी मागणी व्यक्त केली.तीन ही दिवस कृषी प्रदर्शनात मोठ्या संख्येने व्यावसायिक शेतकरी, विद्यार्थी कृषी प्रदर्शन पाहण्यास आले होते.

पहिल्या दिवशी उद्घाटन झाले.दुसऱ्या दिवशी शाश्वत शेती या विषयावर विनायक पोळ यांचे व्याख्यान संपन्न झाले. तिसऱ्या दिवशी समारोप कार्यक्रमात मराठवाड्या तील शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे कृषी प्रदर्शन या भागातील शेतकरी आणि व्यावसायिकांना वरदान ठरले असल्याचे मत व्यक्त केले.या प्रदर्शनात महाराष्ट्रातील शेतीशीनिगडीत आधुनिक तंत्रज्ञान,पाणीव्यवस्थापन पिक व्यवस्थापन या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या.केज तालुक्यात पहिल्यांदाच कृषी प्रदर्शनाचे आयेाजन करण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांनी,शेतकरी गटांनी कृषी प्रदर्शनास भेटी दिल्या.

या प्रदर्शनात शेतकऱ्यां साठी आधुनिक शेतीतील नवीन तंत्रज्ञान,सेंद्रिय शेतीचे महत्त्व,ठिबक सिंचन पद्धत,ड्रोन फवारणी,ऊस,सोयाबीन, भात,डाळी इत्यादी पिकांची सुधारित वाण यांची माहिती देण्यात आली.तसेच विविध कृषी यंत्रसामग्री,खत,बियाणे आणि कीड नियंत्रणाचे उपाय यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अनेक शेतकरी या प्रदर्शनाला भेट देऊन मार्गदर्शन घेत होते.

तिसऱ्या दिवशी कृषी प्रदर्शनाची ग्रामीण भागात का गरज आहे या विषयावर व्याख्यान झाले.शेतकऱ्यांना संपन्न व्हायचे असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त करण्यात आले.

महिलांसाठी विशेष स्वयं सहायता गटांचे स्टॉल लावण्यात आले होते, ज्यामध्ये घरगुती उद्योग, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन,कुक्कुटपालन इत्यादी विषयांवर माहिती दिली गेली.विद्यार्थ्यांसाठी कृषी मार्गदर्शन सत्रही घेण्यात आले.प्रयोगशील शेतकरी यांनीही कृषी प्रदर्शनास भेटी दिल्या.

या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाविषयी उत्सुकता निर्माण झाली असल्याचे दिसून आले.शिंजीर मिल्क ॲण्ड ॲग्रो प्रोडयुसर कंपनीने पुढाकार घेत या कृषी प्रदर्शनाचे आयेाजन केले आहे.यामुळे केज तालुक्यातील तसेच बीड जिल्हयातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी येत आहेत प्रदर्शनामध्ये प्रगत शेती,मशिनरी,आधुनिक साधने,सुधारीत बीयाणे, खते,किटक नाशके,दुग्ध व्यवसाय या विषयी थेट प्रात्यक्षीके आहेत.हे प्रदर्शन शेतकरी,व्यापारी, विक्रेते,वैज्ञानिक, विदयार्थी यांच्यासाठी एकव्यासपीठ म्हणुन उपलब्ध आहे.

बायोगॅस ड्रायर,ड्रोन प्रात्यक्षिक,ग्रामसंस्कृती देखावा ठरले प्रमुख आकर्षण

कृषी प्रदर्शनात ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक व ग्राम संस्कृती तयार करण्यात आलेला जिवंत देखावा हे कृषी प्रदर्शना तील महत्त्वाचे आकर्षण ठरले या भोवती अनेक विद्यार्थी शेतकरी जिज्ञासुपने निरीक्षण करताना दिसून आले.

  • विविध कंपनीचे प्रतिनिधी
  • स्टॉल घेऊन कृषी प्रदर्शनात सहभागी झाले होते.
  • शेतकरी व्यवसायिकांनी साधनांची खरेदी
  • साधने बुकिंग केले,
  • कृषी प्रदर्शनामुळे

सवलतीच्या दरात शेतीची साधने उपलब्ध झाली. शेतकऱ्यांचा फायदा यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

शहरातील नोकर वर्गातील नागरिकांनी कृषी प्रदर्शनास कुटुंबासह भेटी दिल्या.

विद्यार्थ्यांसाठी हे कृषी प्रदर्शन उत्सुक असे ठरले.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनात सहभाग नोंदवला.केज येथील कृषी प्रदर्शन यशस्वी झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!