शिवसेनेचे उप तालुका प्रमुख महेंद्र चाटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

केज/प्रतिनिधी
शिवसेना केज उप तालुकाप्रमुख महेंद्र चाटे यांचा वाढदिवस केज येथील शिवसेना तालुका संपर्क कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मान्यवरांनी महेंद्र चाटे यांचा सत्कार करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळूक,तालुका प्रमुख पृथ्वीराज पाटील, विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाणे,युवा सेना तालुकाप्रमुख दत्तकुमार काकडे, शेतकरी सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष आदित्य रांजणकर,सोनीजवळा येथील सरपंच गोविंद ससाणे,युवासेना उप तालुकाप्रमुख शिवाजी गायकवाड,ज्येष्ठ नेते मालोजी नाना गलांडे पाटील,बळीभाऊ चाटे, वैजनाथ गायकवाड, सोनीजवळा ग्रामपंचायत सदस्य प्रताप वैरागे, तसेच दत्ता पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महेंद्र चाटे यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम आनंदी वातावरणात पार पडला.



