परळी येथे भाजप चा दिपावली स्नेह संपन्न, ना.पंकजाताई मुंडे यांनी फुंकले निवडणूकीचे रणशिंग

केज/प्रतिनिधी

परळी येथे रविवारी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.बीडजिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते तसेच पदाधिकारी,कार्यकर्ते, बुथ प्रमुख , सरपंच, विविध संस्थांचे संचालक आणि मुंडे कुटुंबावर प्रेम करणारे असंख्य नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.
या निमित्ताने बीड जिल्ह्या तील सर्वांशी संवाद साधता आला.आपल्या राजकीय प्रवासात, चांगल्या आणि वाईट काळात साथ देणाऱ्या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त केली तसेच सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा ही दिल्या, जिल्ह्यातील सर्व मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी देखील भाऊबीज निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित व माधवराव तात्या निर्मळ यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.दोघांचेही पक्षात स्वागत करून त्यांचा यथोचित सन्मान राखला जाईल अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे,बाळराजे पवार,जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ देशमुख,बीड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. तत्पूर्वी देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रमाचा उपस्थित कार्यकर्त्यांनी मोठया स्क्रीनवर पाहिला.या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यां मध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.



