जे पी अॕडव्हरटाईझमेंट अँड मार्केटिंग बिझनेस यांच्या वतीने दीपावली फराळ सोहळा उत्साहात संपन्न

केज /प्रतिनिधी
दीपावलीच्या आनंदमयी वातावरणात जे पी अॕडव्हरटाईझमेंट अँड मार्केटिंग बिझनेसच्या वतीने फराळ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम संचालक प्रशांत हजारे सर यांच्या पुढाकाराने जे पी अॕडव्हरटाईझमेंट अँड मार्केटिंग बिझनेस कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे,नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड मॅडम,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जेष्ठ नेते डॉ.हारूणभाई इनामदार,शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस भाई मोहन गुंड, नगरसेवक भाऊसाहेब गुंड,रिपाई तालुका उपाध्यक्ष रमेश निशिगंध, रिपाई सरचिटणीस गौतम बचुटे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आयटी सेल तालुका अध्यक्ष सुरज काळे,मोटेगावचे सरपंच रामकृष्ण पोळ, कासारीचे सरपंच व चेअरमन अमोल दादा डोईफोडे,उत्तम डोईफोडे सर,तसेच रिपाईचे ज्येष्ठ नेते दिलीप बनसोडे, पत्रकार रंजित घाडगे, पत्रकार प्रदीप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी जे पी ऍडव्हरटाईझमेंट अँड मार्केटिंग बिझनेसचे सर्व कर्मचारीवर्ग,मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिक मोठ्या उत्साहातसहभागी झाले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.उपस्थित मान्यवरांनी संचालक प्रशांत हजारे सर यांच्या सामाजिक बांधिलकी, समन्वयक वृत्ती आणि कार्यतत्परतेचे मनःपूर्वक कौतुक केले.कार्यक्रमाच्या शेवटी दीपावलीच्या शुभेच्छा देत सर्वांनी एकमेकांना स्नेहपूर्वक फराळाचे वाटप केले. आणि सणाच्या आनंदात सहभागी झाले.



