अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तांबवा पंचायत समिती गणात शंकर तपसे यांच्या मातोश्री सौ.सत्वशीला तपसे यांचे नाव चर्चेत

केज/प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका तब्बल आठ वर्षानंतर होत आहेत. कार्यकाळ संपून तीन वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतर या निवडणुकी ची रणधुमाळी सुरू झाली आहे.दि.१३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली.पंचायत समिती तील तांबवा गण ओपन महिलेसाठी सुटलेले आहे.
या गणातून अनेक उमेदवार इच्छुक असले तरी माजीमंत्री तथा आ. धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा जगदंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शंकर तपसे हे गेल्या अनेक वर्षांपासून जनहिताची कामे करून लोकांच्या संपर्कात असतात. शंकर तपसे यांच्या मातोश्रीचे नाव पंचायत समितीसाठी प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आले आहे.
शंकर तपसे यांच्या मातोश्री सौ.सत्वशीला तपसे यांनी अडीच वर्ष चंदनसावरगावचे यशस्वी पणे उपसरपंच म्हणून काम केलेले आहे.चंदनसावरगाव ग्रामपंचायतच्या विद्यमान
सदस्या देखील आहेत. शंकर तपसे राजकीय, सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असतात.तसेच शंकर तपसे मोठे उद्योजक असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क गाव खेड्या पर्यंत आहे व त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांची जिल्ह्यात ओळख आहे.
शंकर तपसे यांचा तांबवा पंचायत समिती गणात दांडगा जनसंपर्क असून ते सतत सर्वांच्या सुखदुःखात सहभागी असतात.सर्व समाजात वावर असलेले शंकर तपसे यांनी प्रत्येकाच्या प्रश्नांशी बांधिलकी जपली आहे.उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने सौ.सत्वशीला तपसे यांना संधी दिल्यास ते निश्चितच त्या संधीचे सोने करून तांबवा गणाचा सर्वांगीण विकास साधतील,असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
शंकर तपसे हे राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रात नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवत असून, त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे व जनसंपर्कामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार सहज विजयी होईल,असे मत स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.



