केज शहरात आता तिसऱ्या डोळ्याची करडी नजर,पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवने यांची पत्रकार बांधवांना दिली माहिती

केज/प्रतिनिधी
केज पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवने यांनी केज शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांविषयी सविस्तर माहिती दिली.केज शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी हे कॅमेरे महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केज शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारांवर करडी नजर ठेवता येत असून, नागरिकांची सुरक्षितता अधिक बळकट झाली आहे.प्रत्येक प्रमुख चौक,बाजारपेठ तसेच संवेदनशील भाग या कॅमेऱ्यांच्या देखरेखी खाली आले आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवने यांनी दिली आहे.
पत्रकार बांधवांशी वार्तालाप करताना त्यांनी तिसरा डोळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रणाली मुळे अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



