मुंबई येथील आझाद मैदानावरील आंदोलन कर्त्यांच्या अवहेलनेमुळे युवकाची आत्महत्या खासदार बजरंग सोनवणे यांची सुगाव येथे सांत्वनपर भेट

केज/प्रतिनिधी
मुंबई येथे आझाद मैदानावरील सुरू असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठीच्या आंदोलनात उपोषणकर्त्यांची होत असलेली अवहेलना सहन न झाल्याने कै. नितीन माणिक चव्हाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना अत्यंत वेदना दायक आणि मन हेलावून टाकणारी असल्याची भावना व्यक्त करत खासदार बजरंग सोनवणे यांनी सोमवार दि.1 सप्टेंबर रोजी सुगाव ता. अंबाजोगाई येथे जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.या दुर्दैवी प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत खासदार सोनवणे म्हणाले की,आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.ईश्वर कै.नितीन चव्हाण यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य लाभो हीच प्रार्थना आहे असे खा. बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.
चव्हाण यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही घटना गंभीर मानली जात आहे.



