शिरूर पंचायत समिती गणातून निवडणूक लढणार – सुमंत धस प्रामुख्याने नागरिकांचे प्रश्न तालुका ठिकाणीच असतात,पंचायत समिती च्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवता येतील या धोरणाने शिरूर पंचायत समिती गणातून निवडणूक लढणार.

केज/प्रतिनिधी
नांदूरघाट जिल्हा परिषद गटामध्ये गेली सात वर्षे जनहिताची कामे करून लोकांच्या संपर्कात असलेले सुमंत धस नांदूर जिल्हा परिषद गटातील शिरूर पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
सुमंत धस यांनी कोविड काळात शिरूरघाट येथे लताई कोविड केअर सेंटर सुरू करून शिरुरघाट व बाजूच्या गावातील शेकडो नागरिकांना कोविड काळात सहकार्य केले होते,लोकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे म्हणून कोविड काळात आर्सेनिक अल्बम ३० औषधाचे घरोघरी जाऊन वाटप केले होते. शेतकऱ्यांच्या विवीध प्रश्नांसाठी सुमंत धस यांनी अनेक आंदोलने केले आहेत,सदैव नागरिकांच्या सुख दुःखात अडीअडचणीत सुमंत धस उपलब्ध झाले आहेत.
नागरिकांचे प्रमुख प्रश्न, अडचणी,कामे हे तालुक्यातील पंचायत समिती,तहसील,कृषि कार्यालय,दवाखाना याच ठिकाणी प्रामुख्याने असतात ,पंचायत समिती च्या माध्यमातून तालुका स्थरावर नागरिकांचे प्रश्न सोडवता येईल हा विचार करत तसेच सुमंत धस यांचे सहकारी, मित्र, मार्गदर्शक व नागरिकां सोबत चर्चा करून शिरूर पंचायत समिती गणातून स्वतःहा लढण्याचा निर्णय सुमंत धस यांनी घेतला आहे.
गेली सात वर्षे विविध मार्गाने नागरिकांच्या मदतीला पडलो आहे,अडचणीत सहकार्य केले आहे, कोविड काळात नागरिक उपयोगी काम केले आहे, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सतत आवाज उठवत राहिलो आहे, नागरिकांची प्रामाणिक पणे काम करणारा कार्यकर्ता म्हणून शिरूर घाट पंचायत समिती गणातील माय बाप जनतेने माझ्या पाठिशी उभा रहावे असे आवाहन सुमंत धस यांनी केले आहे.



