कर्मयोगी शिक्षण महर्षी शामराव गदळे गुरुजी व बाळूताई शामराव गदळे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध लोक उपयोगी सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील शाम विद्यालयात संस्थेचेसंस्थापक शामराव गदळे गुरुजी व त्यांच्या धर्मपत्नी बाळूताई गदळे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भारुड,मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर,किर्तन व विविध क्षेत्रात यशसंपादन केलेल्या गुणवंताचा सत्कार अशा विविध उपक्रमाचे आयोजन केलेले आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की,शामराव गदळे गुरुजी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये १९६७ ला वडमाऊली विद्या प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेची स्थापना करून शाम माध्यमिक विद्यालय,शाम कनिष्ठ महाविद्यालय व शाम वरिष्ठ महाविद्यालय सुरू केले आणि ज्या काळात संपूर्ण समाज अक्षरापासून वंचित होता अशा ग्रामीण भागातील समाजाच्या मुलांच्या हाती वही आणि पेन देण्याचे काम शामराव गुरुजी यांनी केले या संस्थे अंतर्गत चालणाऱ्या शाखा मधून अनेक मुले डॉक्टर, इंजिनिअर, वकील ,शिक्षक झाली हे कार्य करत असताना त्यांना फार मोठा सामाजिक आर्थिक व राजकीय संघर्ष करावा लागला होता संघर्षाच्या काळात व शेवटच्या क्षणा पर्यंत खंबीर आणि निर्भय पणे साथ देण्याचे काम त्यांच्या पत्नी ,बाळूताई यांनी केले अशा या पुण्यात्म्याचे पुण्यस्मरण दि.१ नोव्हेंबर २०२५ या दिवशी आहे.
त्यानिमित्ताने दि.३१ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ९ते ११ या वेळेत विनोदी भारुडाचा कार्यक्रम होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि.१ नोव्हेंबरला सकाळी ९ ते ११ या वेळेत रक्तदान शिबिर वआरोग्यतपासणी शिबिर होणार आहे. आरोग्य तपासणी शिबिरा मध्ये नामवंत तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत.
त्यामध्ये डॉ.बालासाहेब कराड, डॉ.रोहन गायकवाड, डॉ.अनंत मुळे,डॉ.लक्ष्मण वारे,डॉ.अमोल गीते, डॉ.चंद्रकांत तोंडे,डॉ. गणेश देशमुख,डॉ.माधुरी माळेकर,डॉ.सुरेश ठोंबरे, डॉ.गंगाराम डोंगरे व डॉ. रामप्रभू तिडके हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. त्यानंतर ११ ते १ यावेळेत महाराष्ट्रातील ख्यातनाम विनोदी कीर्तनकार ह.भ.प.शिवलीला ताई पाटील यांचे कीर्तन होईल त्यानंतर विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या यशवंताचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होईल. व त्यानंतर भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
वरील सर्व कार्यक्रमाचा लाभ परिसरातील व केज तालुक्यातील सर्व मंडळींनी घ्यावा अशी विनंती श्री.सखाहरी तात्या गदळे,डॉ.शशिकांत दहिफळकर, श्री.शरद गदळे,डॉ.शालिनीताई कराड सरपंच सौ. अनिता शशिकांत गदळे ,प्राचार्या जयश्री शरद गदळे, प्राचार्य तथा भाजपा युवा मोर्चाचे केज तालुकाध्यक्ष श्री. राहुल भैय्या गदळे व श्री. जयदत्त गदळे यांनी केली आहे अशी माहिती प्रसिद्धी माध्यमांना प्राध्यापक श्री. सरपंच तात्यासाहेब डोईफोडे सर यांनी दिली आहे.



