एसबीआय बँकअधिकारी संघटनेचे महाराष्ट्र राज्य महा सचिव डॉ.सतीश टाके यांची केज येथील स्वामी समर्थ मठात सदिच्छा भेट

केज/प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या एसबीआय बँकेच्या अधिकारी संघटनेच्या निवडणुकीत महासचिव म्हणून निवडून आलेल्या डॉ.सतीश टाके यांनी केज येथील श्री स्वामी समर्थ मठात भेट दिली.यावेळी त्यांनी श्री.स्वामी समर्थां च्या बाल रूपातील अजानबाहु मुर्तीचे व पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी श्री स्वामी समर्थ मठाचे विश्वस्त मंदार देशपांडे यांनी त्यांचे स्वागत केले व श्री स्वामी समर्थांची मूर्ती भेट देवून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी गणेश देशपांडे,दिनेश देशपांडे, राजेश देशपांडे, विनायक ठोंबरे,रोहन वेदपाठक, संतोष रिनवा यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की,केज येथील स्वामी समर्थ मठात येऊन दर्शन घेण्याची खुप इच्छा होती ती आज पुर्ण झाली. स्वामी समर्थ मठात होत असलेल्या विविध कार्यक्रमा विषयी मंदार देशपांडे यांनी माहिती दिली.



