केज तालुक्यात नामेवाडी व केज येथे झालेल्या अपघातात दोन जण ठार

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील नामेवाडी येथे शनिवारी दि.18 ऑक्टोबर रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या एका ट्रॅक्टरने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील शालेय विद्यार्थी जागीच ठार झाला तर त्याच्या मामाच्या दोन्हीही पायावरून ट्रॅक्टरचे टायर जाऊन गंभीर जखमी झालेल्या मामाला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
केज तालुक्यातील नामेवाडी येथील सचिन महादेव वायबसे या शेतकऱ्याने साखर कारखान्याला ऊसतोडणी साठी ट्रॅक्टरलावण्यासाठी शुक्रवारी नवीन ट्रॅक्टर खरेदी करून नामेवाडीत आणला होता.दरम्यान शनिवारी दुपारी सचिन वायबसे यांनी शिंदी फाट्यावरील ढाब्यावर दारू पिवून तॊ ट्रॅक्टर चालवीत नामेवाडीकडे जात आसताना दुपारीं साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घाटेवाडीला जाणाऱ्या रस्त्याजवळ समोरून दुचाकीवर येणाऱ्या मामा, भाच्याच्या दुचाकीला जोराची धडक देऊन झालेल्याअपघातात शालेय विद्यार्थी गणेश अशोक वायबसे वय 15 वर्षे रा.नामेवाडी हा जागीच ठार झाला.
तर त्याचे मामा विठ्ठल रामदास आंधळे रा. आंधळेवाडी यांच्या पायावरून ट्रॅक्टरचे समोरचे टायर गेल्यामुळे त्यांचे दोन्हीही पाय निकामी झाले आहेत. दरम्यान रुग्णवाहिकेतून जखमी विठ्ठल रामदास आंधळे यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरज हजारे यांनी बोलताना दिली.तर मयत गणेश अशोक वायबसे याचे पार्थिव विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले.
केज उपजिल्हा रुग्णालया समोर अपघातात एकजण ठार
शनिवारी रात्री सात वाजण्याच्या दरम्यान पिसेगाव येथील मजूर केज येथे मजुरीचे काम करून दुचाकीवरून आपल्या गावी परत जात असताना केज येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या जवळ सैन्य दलाच्या जाणाऱ्या वाहनाला त्याच्या दुचाकीचा धक्का लागून सुनिल माणिक लांडगे वय 19 वर्षे हा महामार्गांवर पडलाअसता पाठीमागून येणारे वाहन त्याच्या पायावरून गेल्या मुळे सुनिल लांडगे या मजुराचा जागीच मृत्यू झाला असून त्याचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम यांनी बोलताना दिली.ऐन दिवाळीच्या पूर्व संद्येला दोन अपघातात दोघे जण ठार झाल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

