बीड येथे स्व.झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठानच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथेचे भव्य आयोजन दि.५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान आध्यात्मिक पर्वाचे आयोजन

बीड/प्रतिनिधी
मराठी संतपरंपरेतील आद्य संत आणि ज्ञान योगाचे प्रणेते संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या साडे सातशेव्या जन्मजयंती निमित्त बीड शहरात भव्य संत ज्ञानेश्वर जीवन चरित्र कथा आयोजित करण्यात आली आहे.
स्व. झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने ५ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.दररोज सकाळी १० ते सायंकाळी १० वाजेपर्यंत अखंड भक्तीचा सोहळा रंगणार असून, परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.आध्यात्मिक ज्ञान आणि भक्तीचा संगम घडवणारी ही कथा भाविकांसाठी सद्गुणप्रेरित जीवनाची दिशा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
आध्यात्मिक,सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचा सोहळा
भक्तीसोहळ्यात ज्ञानेश्वरीतील अध्यात्मिक विचार,संत परंपरेचे तत्त्वज्ञान ,हरिपाठ-कीर्तन , प्रवचनांद्वारे जीवनमूल्ये आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात येणार आहे.बीड शहरातील तसेच परिसरातील भाविकांसाठी ही एक अतुलनीय आध्यात्मिक मेजवानी ठरणार आहे. प्रवेश सर्वांसाठी खुला असुन भाविकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक आनंद आणि ज्ञानप्राप्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्व. झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठानने केले आहे.
या कार्यक्रमा साठी प्रवेश विनामूल्य असून सर्व आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भक्ती, ज्ञान आणि संस्कृतीचा उत्सव असलेल्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी उत्सुकता वाढत असून, बीड शहरात भाविकांची गर्दी उसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.



