सामाजिक

जेष्ठ नागरिक सन्मान व प्रबोधनाचा रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम

गेवराई/प्रतिनिधी

एकत्र कुटुंब पद्धती लयाला जात असल्याने कलह निर्माण होत आहेत.घरात वयोवृद्ध व्यक्ति नसल्याने नियंत्रण राहिले नाही जे काही वयोवृद्ध जेष्ठ नागरिक आहेत त्यांना चांगली वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

देशाची खरी संपती असलेल्या सर्व जेष्ठ नागरिकांचा यथायोग्य मान राखून युवापिढी कडून त्यांचा सन्मानच झाला पाहिजे असे प्रतिपादन न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनिल चव्हाण यांनी गेवराई येथे केले.गेवराई येथील रोटरी क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता जेष्ठ नागरिक सन्मान व प्रबोधन सोहळाआयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी न्यू हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक सुनिल चव्हाण हे होते.प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते एस.वाय. अन्सारी,रोटरी क्लब ऑफ गेवराईचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र बरकसे,सचिव प्रविण जैन यांची होती .

सुरुवातीला रोटरी इंटर नॅशनलचे संस्थापक पॉल हॅरिस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.जेष्ठ कलावंत विष्णुप्रसाद खेत्रे यांनी स्वागत गीत व साने गुरुजींचे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे गीत सादर केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत जेष्ठ नागरिक संघाचेअध्यक्ष प्रा.संदिपान हिंगे,ईश्वर आबदरे, बाबुराव नागरगोजे,रो. राजेंद्र डेंगे,एस.पी. सूर्यवंशी,सखाराम कानगुडे आदींनी केले. प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा.बरकसे यांनी केले तसेच रोटरी क्लबने केलेल्या कामांचा आढावा घेतला.यावेळी प्रा.सुरेश पाटील यांचे निसर्गोपचार या विषयावर तर ॲड. सुभाष निकम यांनी जेष्ठ नागरिकांचे हक्क व जबाबादाऱ्या या विषया वर मार्गदर्शन केले.

जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून वयोवृद्ध जेष्ठ नागरिक स्वातंत्र्यसैनिक बाबुराव पिंपळे,व्यंकटराव पंडित,देवराव कांडेकर, नसीर पठाण,धन्यकुमार जैनआदींना सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी एस. वाय.अन्सारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून हम भी कुछ कम नहीं असे दाखवून दिले.गतवर्षात मयत झालेले जेष्ठ नागरिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. पसायदान व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

सूत्र संचालन गणेश कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रमास रोटरी क्लबचे संचालक सदस्य डॉ.विजय सिकची, राजेंद्र डेंगे, राधाकिसन लड्डा,रामदास शिंदे,प्रा. आर.डी.मुंडे,जेष्ठ नागरिक संघाचे सखाराम कानगुडे, राजेंद्र झंवर,दिलीप काकडे, बाबुराव मोताळे, रामकृष्ण चेडे,प्रा.अंकुश चव्हाण, एस.पी. सूर्यवंशी, प्रभाकर घोडके,प्रकाश दावणगिरे, साहेबराव बडे, शिवप्रसाद भुतडा,अरूण परदेशी, नागनाथ घसिंग, अब्दुल मुखीदभाई,गौतम कांडेकर,कैलास चौधरी, सुरेश आतकरे, भास्कर ननवरे, त्रिंबक गरड, बंडू गायकवाड, ओमप्रकाश बाहेती, विलास मडकर, अर्जून माने,संजय हिंगे यांच्यासह जेष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!