केज शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहाचे लोकार्पण संपन्न

केज /प्रतिनिधी
केज शहरातील क्रांतीनगर परिसरात सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह शनिवारी दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन मा.अॕड.गोरक्षजी लोखंडे (सचिव दर्जा, अनुसूचित जाती-जमाती आयोग,महाराष्ट्र शासन, मुंबई) यांच्या शुभहस्ते झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. रमेशरावजी आडसकर, चेअरमन,अंबा सहकारी साखर कारखाना, यांनी भूषविले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) चे जेष्ठ नेते डॉ.हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड,जेष्ठ समाजसेवक बाबुराव गालफाडे,आर.पी.आय.(आठवले) तालुकाध्यक्ष सुनील हिरवे,लहुजी शक्ती सेना महिला जिल्हाध्यक्ष प्रियंका लांडगे,नगरसेवक अझरभाई इनामदार, दलित महासंघ तालुकाध्यक्ष विनायकराव लोंढे,नगरसेवक राजूभाई इनामदार, माजी नगरसेवक महादेव लांडगे,आझाद क्रांती सेना तालुकाध्यक्ष शरद थोरात,लखन हजारे, डॉ.क्षीरसागर, रोहित कसबे,अशोक गायकवाड तसेच पत्रकार रणजित घाडगे व प्रदिप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रांतीनगर परिसरातील नागरिकांसाठी हे सभागृह सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरणार असून,या भागाच्या विकासात हे एक नवे पर्व ठरेल,असे उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केले. या सभागृहाच्या उभारणीसाठी नगरसेवक अझरभाई इनामदार यांचे पुढाकार महत्त्वाचे ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अशोक शिंदे,धीरज कांबळे, इरफान पठाण,अजय गालफाडे, सय्यद आखिल, अशोक कांबळे तसेच संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.या सोहळ्यास क्रांतीनगर परिसरातील नागरिक व विविध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.आभार प्रदर्शना नंतर कार्यक्रम संपन्न झाला.



