आज केज येथील गंगा माऊली शुगरचा ४ था गळीत हंगाम शुभारंभ

केज/प्रतिनिधी
केज येथील गंगा माऊली शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा.लि.उमरी चा सन २०२५–२०२६ च्या ४थ्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज दि.२४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११-०० वाजता मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुखपाहुणे म्हणून खा. सौ.रजनीताई पाटील सांसद,राज्यसभा व श्री.अशोक दादा पाटील माजी मंत्री,महाराष्ट्र राज्य उपस्थित रहाणार आहेत.
या कार्यक्रमास लक्ष्मण रावजी मोरे चेअरमन,गंगा उद्योग समूह,ह.भ.प.श्री. लक्ष्मण महाराज मेंगडे मठाधिपती बंकटस्वामी मठ संस्थान नेकनुर आणि ह.भ.प.श्री.अर्जुनमहाराज लाड व्याकरणाचार्य तथा अध्यक्ष,भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था, होळ यांच्या शुभ हस्ते शुभारंभ संपन्न होणार आहे.यावेळी आदित्य दादा पाटील सचिव, माऊली विद्यापीठ केज, हनुमंत काका मोरे व्हा.चेअरमन गंगामाऊली शुगर व राहुल भैया सोनवणे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय काॕग्रेस बीड यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.यावेळी सर्व संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत .
हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.तरी या कार्यक्रमाला शेतकरी,शेतमजूर, सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अविनाश मोरे संचालक, व बी.वाय.मुजावर मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रविण मोरे कार्यकारी संचालक यांनी केले आहे.



