सामाजिक

खा.श्री.बजरंग बप्पा सोनवणे यांचा सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार,सम्राट बळीराजाची प्रतिमा भेट देऊन दिपावली निमित्त दिल्या शुभेच्छा

केज/प्रतिनिधी

बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचा सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या वतीने सम्राट बळीराजाची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.शेतकरी पुत्र म्हणून ज्यांनी येडेश्वरी कारखान्याच्या माध्यमा तून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात नवसंजीवनी आणून जिल्ह्यातील जनतेला आर्थिक स्वावलंबी बनवणारे आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्याचे दबंग खासदार म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रात च नव्हे तर भारतात ओळख निर्माण केली आहे.

शेतकरी कामगार कष्टकरी यांच्या सतत मदतीला धावणारे व शेतकऱ्यांचे सदैव प्रश्न सोडवून त्यांच्या अडी अडचणी समजून घेऊन अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना ज्या त्या वेळी उपस्थित राहून मदतीला धावून जाणारे खासदार बजरंग बप्पा सोनवणे हे नाव आज संपुर्ण भारतात आहे.

दिवाळीच्या सणातील बालिप्रतिपदा म्हणजेच जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचा राजा सम्राट बळीराजाचे स्मरण आपण दिवाळी सणात करत असतो. शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी नांदो ही मागणी सणानिमित्त केली जाते व यामुळे आपल्याला बळीराजा आठवतो तो फक्त त्याच दिवसापुरता न आठवता सदैव बळीराजाची आठवण राहावी या साठी सहयाद्री मराठी पत्रकार संघ केज तथा महाराष्ट्र राज्य यांच्या कडून सम्राट बळीराजाची प्रतिमा,शाल,पुष्पहार देऊन बीड जिल्ह्याचे सर्वांना आपलेसे वाटणारे खासदार श्री.बजरंग बप्पा सोनवणे यांचा सत्कार सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी अध्यक्ष गोविंद शिनगारे, प्रदेशाध्यक्ष डॉ.जावेद शेख,कार्याध्यक्ष शहाजी भोसले,केज तालुकाध्यक्ष अनिल ठोंबरे,सचिव डॉ. लतिफ शेख,कार्याध्यक्ष महादेव दौंड,संघटक लक्ष्मीकांत लासीनकर, उपाध्यक्ष दत्तात्रय भाकरे, सहसंघटक,काशीनाथ कातमांडे यांच्या वतीने दिपावली पाडव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या व यावेळी खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या वतीने ही सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा देऊन सह्याद्री मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सत्कार समारंभाबाबत समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!