श्री संस्कार इंग्लिश स्कूल मध्ये डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती साजरी श्री संस्कार इंग्लिश स्कूल मध्ये “वाचन प्रेरणा दिन” साजरा

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संस्कार इंग्लिशस्कूल मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती तथा थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करुन वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
याविषयी सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या श्री. संस्कार इंग्लिश स्कूल मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सर्वप्रथम दिपप्रज्वलन करून माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी श्री संस्कार इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष अनिल गलांडे व प्रिन्सीपल सीमा फुटाणे व शिक्षिका आरती आचार्य यांनी डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवन चरीत्रावर व डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांवर गौरवोद्गार काढून मनोगत व्यक्त केले,या कार्यक्रमाला सोनाली खंदारे, कोमल कापरे,रेश्मा गायकवाड, नेहा शेख,प्रीती गाते, साक्षी बर्डे यांच्यासह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक उपस्थित होते.या कार्यक्रमा चे प्रास्ताविक आरती आचार्य यांनी केले तर आभारप्रदर्शन वैष्णवी काळे यांनी केले.



