पारनेरच्या आर्टस महाविद्यालयास प्रथम तर बालाजी शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यापक महाविद्यालयास व्दितीय पारितोषिक,प्राचार्य भ.कि.सबनीस राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धा

अंबाजोगाई/प्रतिनिधी
योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या वतीने सोमवारी झालेल्या स्व.प्राचार्य भ.कि.सबनीस राज्यस्तरीय वक्त़ृत्व स्पर्धेत सांघिक स्वरूपाचे प्रथम पारितोषिक पारनेरच्या आर्टस् महाविद्यालयास तर येथील बालाजी शिक्षण प्रसारक संस्था संचालित अध्यापक महाविद्यालया स व्दितीय पारितोषिक, धर्मापुरीच्या शंकरराव गुट्टे कॉलेजला तृतीय व स्वा. रा. ती. महाविद्यालयास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले तर वैयक्तिक पारितोषिकात प्रथम रायगड येथील पंकज पाडुळे, व्दितीय महेश उशिर,आर्ट,कॉमर्स, सायन्स कॉलेज पारनेर, तृतीय अनिकेत वणारे, संताजी महाविद्यालय नागपुर व उत्तेजनार्थ आकाश बोडखे ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय संगमनेर यांना देण्यात आले.
बक्षीस वितरण प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष जी.बी.व्यास,संस्थेचे सल्लागार एन.के. गोळेगांवकर,एम.एस. लोमटे आदी उपस्थित होते.प्रा.दुर्गादास चौधरी, अहमदपुर प्रा.मकरंद जोगदंड, परळी,प्रा.अर्चना चव्हाण,घाटनांदुर,प्रा. आशालता होळकर यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.प्रास्तविक प्राचार्य डॉ.पी.एस.देशमुख यांनी केले.
पाहुण्यांचा परिचय प्रा.सविता बुरांडे यांनी करून दिला संचलन प्रा. संपदा कुलकर्णी,प्रा. शैलजा बरूरे यांनी केले स्पर्धेच्या निकालाचे वाचन करून आभार प्रा.डॉ. रमेश सोनवळकर यांनी मानले.प्रारंभी स्पर्धेचे उद्घाटन विचारवंत डॉ.शिरीष खेडगीकर, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापुरकर,माजी व्यवस्थापकीय संचालक, उद्योजक डॉ.विवेक भोसले,प्राचार्य पी.एस. देशमुख आदींच्या उपस्थितीत झाले. आपल्या मनोगतातून मान्यवरांनी स्व.प्राचार्य भ.की.सबनीस यांच्या कार्याला उजाळा दिला व स्पर्धेचा उद्देश विषद केला.या वक्तृत्व स्पर्धेत विविध ठिकाणच्या ४० महाविद्यालयातील संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी अनेक मान्यवर,प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.स्पर्धेच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील कर्मचारी वृदांनी परिश्रम घेतले.



