बनसारोळा येथे स्टार्स ऑन द अर्थ या मॅगझिनचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील बनसारोळा येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक 9 ऑक्टोबर,वार गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता वर्ग सातवी ‘अ’ च्या विद्यार्थ्यांनी दिवाळी निमित्ताने तयार केलेल्या “स्टार्स ऑन द अर्थ” या मॅगझिनचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रकाशन प्रभारी मुख्याध्यापक श्री. रामदास अंबाड यांच्या हस्ते करण्यात आले.या मॅगझिनचे बांधणी कार्य जयदीप पाईकराव या विद्यार्थ्याने कौशल्यपूर्ण रित्या केले असून, संपादक म्हणून सार्थक जोशी आणि सहसंपादक म्हणून करूणा देशमुख यांनी जबाबदारी सांभाळली.
मॅगझिनमध्ये विद्यार्थ्यांनी लिहिलेले विविध विषयांवरील लेख, कविता आणि सर्जनशील लेखनाचा समावेश आहे. यामध्ये वर्षभरातील मुला -मुलींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.मॅगझिन तयार करण्यासाठी इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री.एस. व्ही.रोकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले.या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण आनंददायी आणि प्रेरणादायी होते.



