वडवणी येथे सहकारी पतसंस्था संचालक व कर्मचारी यांचा दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न

बीड/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म.पुणे चे सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर,व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांच्या संयुक्त विद्यमाने वडवणी तालुक्यातील नागरी सहकारी पतसंस्था, पगार सहकारी पतसंस्था संचालक, कर्मचारी यांच्या करीता दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग नागरी सहकारी पतसंस्थे चे अध्यक्ष नारायणराव डिगे होते.प्रशिक्षण वर्गात प्राचार्य डॉ.मन्मथ हेरकर, माजी संचालक गजानन नागरी सहकारी बँक बीड, सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर चे उपप्राचार्य एस. आर.कोळे,प्रमाणित लेखा परीक्षक सी.ए.खोडसे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
समारोप प्रसंगी ए.एस. देशपांडे,सहकार अधिकारी श्रेणी २, प्रमाणित लेखा परीक्षक सी.ए.खोडसे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन,आभार प्रदर्शन वर्ग संयोजक एस. आर.कोळे उपप्राचार्य सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर यांनी केले.



