राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने केज येथे विजयादशमी निमित्त पथ संचालन व शस्त्र पूजन उत्सवाचे आयोजन

केज/प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , केज यांच्या वतीने यावर्षीचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाच्या निमित्ताने पथ संचालन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.हा उत्सव रविवार दि.१२ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडणार असून स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, संघ कार्यालय शेजारी, धारूर रोड,केज येथून सायंकाळी ५.०० वाजता सहघोष पथ संचलन निघणार आहे.यानंतरचा मुख्य कार्यक्रम वकीलवाडी हनुमान मंदिर केज येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध कृषीतज्ञ श्री.विकासजी मिरगणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत,तर देवगिरी प्रांत सह-सद्भाव प्रमुख श्री. आनंदजी गुजर हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.संघाचे तालुका संघचालक डॉ. दत्ता डिसले यांनीदिलेल्या माहितीनुसार,विजया दशमी हा भारतीय संस्कृतीचा गौरवशाली उत्सव असून असत्यावर सत्याचा आणि अन्याया वर न्यायाचा विजय याचा तो संदेश देतो.सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रनिर्माणा साठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो.
या वर्षी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तन या संदेशासह समाज परिवर्तनाची वाटचालसुरू ठेवण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने माता-भगिनींसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांना सहकुटुंब सह परिवार उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,केज तर्फे करण्यात आले आहे.हे पथ संचालन जेथुन जाणार आहे त्या रस्त्यावर रांगोळी काढून पथ संचालन वर पुष्प वर्षाव करण्यात येणार आहे अशी माहिती महिला भगिनी यांनी प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.



