केज येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय बनले दलालाचा अड्डा,दस्त नोंदणीसाठी घेतले जातात हजारो रुपये, गरीब जनतेला लुबाडणाऱ्यांचा बंदोबस्त करावा नागरीकांची मागणी

केज/प्रतिनिधी
केज शहरातील सह दुय्यम कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला असुन दस्त नोंदणीसाठी गोरगरीब जनतेला लुबाडणाऱ्यांचा सपाटा चालु असुन गोरगरीब जनतेला लुबाडणाऱ्या दलालांचा व संबंधित कर्मचारी यांचा बंदोबस्त करुन सर्व सामान्य जनतेला न्याय मिळावा अशी मागणी पक्षकारांकडुन केली जात आहे.
याबाबत सविस्तर बातमी अशी की ,शेत जमिनी अथवा घर जागा खरेदी विक्री करण्यासाठी शासनाने निर्धारित केलेले मुल्यांकन भरुन शासन नियमानुसार विविध कागदपत्रांची पूर्तता करुन दस्त नोंदणीसाठी प्रक्रिया केली जाते.शासन निर्णया प्रमाणे नियमानुसार पुर्ण फिस भरणा करुनही दस्त नोंदणीसाठी हजारो रुपये दलालांच्या मध्यस्थीने कर्मचारी घेत आहेत. शासनाचा पगार असताना सुद्धा सर्व सामान्य जनते कडुन अतिरिक्त पैशाची मागणी केली जात आहे. मुल्यांकन काढुन दिले जात असताना ही डील केली जाते व व्यवहार पुर्ण झाल्यानंतर हा व्यवहार केला जातो.
ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जाते.भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घोषणा केली होती की, न खाउंगा न गाने दुंगा परंतु या घोषणेला हरताळ फासला जात असुन आमचे कोणीही काहीच करु शकत नाही अशा आविर्भावात दलाल व कर्मचारी वावरत आहेत तरी यांच्या व नातेवाईक यांच्या मालमत्तेची चौकशी करून आर्थिक व्यवहार तपासणी व्हावी अशी मागणी केली जात आहे.



