केज कळंब रोडवर पिकअप आणि कारची जोरदार धडक,तीन जण गंभीर जखमी, साळेगाव- माळेगाव पुलावर अपघात केजचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक केली सुरळीत

केज/प्रतिनिधी
दि.6 आॕक्टोबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान केज- कळंब रोडवरील साळेगाव- माळेगाव मोहरील बाबा दर्गा पुलावर पिकअप क्रमांक MH38 E2231 आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात तीन गंभीर जखमी झाल्याची शक्यता असून जखमींना तत्काळ केज उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सदरील घटनेची माहिती मिळताच केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे व त्यांचे सहकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी अपघात स्थळावरील दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. कारला नंबर प्लेट नसल्यामुळे वाहन क्रमांक दिसला नाही,अशीमाहिती पोलिसांनी दिली आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून पुढील तपास केज पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलिस करीत आहेत.



