बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बीड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये दोन दिवसीय सहकार प्रशिक्षण वर्ग संपन्न – प्रा. बबनराव आंधळे


बीड/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकार संघ पुणे चे सहकार प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राजुरी वेस बीड या ठिकाणी शनिवार दिनांक ३१ जानेवारी २०२६ व रविवार दिनांक १फेब्रुवारी २०२६ या दोन दिवसीय सहकार प्रशिक्षणासाठी बीड तालुक्यातील नागरी पगारदार,सेवक,कर्मचारी,पतसंस्था संचालक, कर्मचारी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे श्री.आर.व्ही.उबाळे यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा सहकार बोर्डाचे उपाध्यक्ष श्री.सुहास पाटील हे होते. प्रमुखपाहुणे म्हणून बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे श्री.के.यु.आघाव, श्री.एस. पी.राठोड, लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. भागवत वैद्य,झुंजार नेता चे उपसंपादक आत्माराम वाव्हळ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सर्जेराव मोराळे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुकाराम आंधळे,ए.एस.कदम, सेवानिवृत्त उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड, अॕड.हनुमंत कांबळे,सेवा निवृत्त सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बीड, प्रसिद्ध उद्योजक संतोष राव निकाळजे तसेच लोकशाही पत्रकार संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनंदाताई केदार मॅडम, बीड जिल्हा संघटक श्री. संजय कुलकर्णी, बोरखेडे साहेब प्रमाणित लेखा परीक्षक बीड श्री.चव्हाण सर प्रमाणित लेखा परीक्षक बीड श्री.सातपुते सर,प्रमाणित लेखा परीक्षक सहकारी संस्था बीड इत्यादी मान्यवर पहिल्या दिवशीच्या सत्राच्या प्रसंगी उपस्थित होते.
या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात पहिल्या दिवशी श्री.एन.एन. कुलकर्णी वसुली अधिकारी सोलापूर व दुसऱ्या दिवशी श्री. चत्रभुज खोडसे प्रमाणित लेखा परीक्षक सहकारी संस्था बीड तसेच या प्रशिक्षण वर्गाचे संयोजक सहकार प्रशिक्षण केंद्र लातूरचे उपप्राचार्य श्री. कोळे साहेब यांनी देखील वसुली संदर्भात चांगले मार्गदर्शन केले तर दुसऱ्या दिवशी समारोप समारंभाच्या अध्यक्ष स्थानी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री. कल्याणराव आखाडे हे होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा शिक्षक संघाचे सर चिटणीस श्री.राजकुमार कदम सर,श्री.तांदळे सर मार्गदर्शक मराठवाडा शिक्षक संघ,श्री.भारत मोराळे सर व दैनिक मराठवाडा साथीचे जिल्हा प्रतिनिधी श्री.संदीप बेदरे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सदरील कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांचे स्वागत बीड जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक प्राध्यापक श्री. बबनराव आंधळे सर यांनी केले व नंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यीना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहकार प्रशिक्षण केंद्र लातूरचे उप प्राचार्य श्री.एस.आर.कोळे सर यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.



